दिपिका चव्हाण व इतर महिला आमदारांच्या ‘ठिय्या’नंतर तहसीलदार सौंदाणे निलंबित

23 Dec 2017 , 07:01:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दिपिका चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी बागलाण येथील स्थानिक तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्यावर विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव दिला होता. सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणेही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने काही कारवाई केली नाहीतर समाजात वाईट संदेश जाईल. अधिकाऱ्यांची मुजोरी वाढेल. म्हणून याप्रकरणी आजच्याआज तहसीलदाराला निलंबित कराअशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली. दीड वर्षानंतरही आपण महिला लोकप्रतिनिधीला न्याय देऊ शकत नाहीहक्कभंग समिती अधिक वेळ मागत आहे. सहा सहा महिन्यात प्रांत आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. मग या प्रकरणात का विलंब होत आहेअसा प्रश्न त्यांनी विचारला. विशेषाधिकार समितीने मुदतवाढ मागितल्याच्या विरोधात आ. दीपिका चव्हाण आणि इतर महिला आमदारांनी वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले.

कुठल्याही सदस्याचा अपमान केलातर हे सभागृह त्या मस्तवाल अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीअसा सज्जड दम विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हक्कभंग प्रस्तावावर बोलताना दिला. परिणामीमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बागलाण येथील स्थानिक तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या निलंबनाची घोषणा केली.

संबंधित लेख