कळवा परिसरातील वाहतुककोंडी सोडवणाऱ्या प्रकल्पांचा प्रश्न पुढच्या सात दिवसात मार्गी लावणार का? : आ. जितेंद्र आव्हाड

27 Dec 2017 , 08:19:36 PM

कळवा परिसरात होणाऱ्या वाहतुककोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा ते कोपरी दरम्यान खाडीपुलाची उभारणी, कळवा ते आत्माराम पाटील चौक दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, सर्व्हीस रोड हे प्रकल्प प्रलंबित आहेत. या प्रकल्पांच्या सर्व परवानग्या मिळाल्या असूनही केवळ या प्रकल्पाच्या फाईल्सवर मुख्यमंत्र्यांचे हस्ताक्षर बाकी असल्याने हे प्रकल्प प्रलंबित आहेत. म्हणूनच पुढच्या सात दिवसात हे प्रश्न मार्गी लावणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उठवला.

यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या मुद्द्यांसाठी लवकरात लवकर बैठक आयोजित केली जाईल व सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन दिले आहे.

संबंधित लेख