निकृष्ट दर्जाचे पाझर तलाव बांधणा-या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा : आ. अजित पवार

27 Dec 2017 , 08:56:06 PM

आज प्रश्नोत्तराच्या तासात आमदार संग्राम थोपटे यांनी निगडे येथील पाझर तलाव फुटल्याने शेतीचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत आ. अजित पवार यांनी मत व्यक्त केले. निगडे येथील जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचा निकृष्ट दर्जाचा पाझर तलाव फुटून सुमारे ७५ हेक्टर शेतीचे आणि सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा निकृष्ट दर्जाचे पाझर तलाव बांधणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा आणि ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले की शाखा अभियंता आणि उप-अभियंता यांना निलंबित केले आहे. तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची घोषणादेखील त्यांनी सभागृहात केली.

संबंधित लेख