राष्ट्रवादीच्या ओबीसी जनजागृती अभियानाला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा

06 Jan 2018 , 07:11:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलद्वारे आयोजित केलेल्या ओबीसी जनजागृती अभियानाच्या रथाला मालेगाव येथे मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दर्शवला. ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात २१ डिसेंबरपासून ओबीसी जनजागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाची सुरुवात नागपूर येथून झाली असून या अभियानाचा रथ मालेगाव येथे पोहोचला त्यावेळी मुस्लिम बांधवांनी या रथाचे स्वागत केले व समर्थन दिले.

या भेटीदरम्यान मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच आपल्या समस्याही मांडल्या. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला हवे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. काही भागांमध्ये योग्य वीजपुरवठा नाही अशा स्थानिक प्रश्नांसंबंधीही तक्रारी त्यांनी उपस्थित केल्या.