एकनाथ खडसे जो निर्णय घेतील त्याचे स्वागतच - नवाब मलिक

13 Jan 2018 , 09:07:03 PM

'माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवीन संशोधन करीत बारामतीमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांना तेथील कृषी विकास पाहण्याचे आवाहन करत असतो. याच विकासामुळे आपल्यालाही बारामतीत जाऊन रहावेसे वाटते’, असे मत भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे जो निर्णय घेतील त्याचे स्वागतच आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्त नवाब मलिक म्हणाले.

यावर अधिक बोलताना मलिक म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बारामतीतील शेती यंत्रणा सक्षम वाटते. बारामतीत शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते, त्याने ते प्रभावित झाले आहे. आदरणीय पवार साहेबांचे विचार त्यांना पटतात. खा. शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची कार्यशैली आणि निर्णय क्षमता खडसेंना पटत असल्यामुळे ते असे म्हटले. मलिक म्हणाले की संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट- माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे खरे बोलत आहे. खडसेंवर पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे अन्याय होत आहे. कार्यकर्ते त्यांच्यावर पक्ष सोडण्यास दबाव टाकत आहेत. त्यामुळे खडसे जो निर्णय घेतील त्याचे स्वागतच आहे.

संबंधित लेख