या तरूणाईच्या लाटाच राष्ट्रवादीचे सरकार आणतील - सुनील तटकरे

19 Jan 2018 , 06:59:01 PM

मागच्या निवडणुकीत भाजपची लाट आली आणि त्यांचे सरकार निवडून आले. आम्ही मागचे तीन दिवस उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात तरूणाईच्या उत्साहाने उसळलेल्या लाटा पाहत आहोत. या तरूणाईच्या लाटाच २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरकार आणतीलअसा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. हल्लाबोल आंदोलनात अंबेजोगाई येथील सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की आज हल्लाबोल आंदोलनाच्या सभांना प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहत आहे. हे पाहून हे स्पष्ट होते की ही परिवर्तनाची नांदी आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सभेत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की ऑनलाईन कर्जमाफीसाठी इनोव्हेव कंपनीला १०० कोटी दिले. कर्जमाफीच्या जाहिरातीसाठी ३५० कोटी खर्च केले. पण शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र दमडीही आली नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावीत्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे. आघाडी सरकारच्या काळात जेवढी महागाई होतीत्यापेक्षा जास्त महागाई आता झाली आहेअसेही ते म्हणाले.

या सभेला आ. राजेश टोपे आ. सतीश चव्हाणआ. विक्रम काळेआ. रामराव वडकुतेमाजी आ. प्रकाश सोळुंकेआ. विद्या चव्हाणजिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणेमहिला प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघयुवानेते संदिप क्षीरसागरमुख्य प्रवक्ते नवाब मलिकराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटीलमाजी आ. उषाताई दराडेमहिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फडमाजी आ. संजय वाकचौरेराष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळेबीड युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख