सॅनिटरी पॅडवरील GST विरोधात राज्यभरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

19 Jan 2018 , 07:02:42 PM

सॅनिटरी पॅड GSTतून वगळण्यासाठी आज राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला. सॅनिटरी पॅड ही चैन नसून महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. हे सरकारच्या लक्षात यावे यासाठी मकरसंक्रातीच्या काळात एकजुटीने राज्यभर महिला एकत्र आल्या आणि न्यायासाठी आंदोलन केले. विविध जिल्ह्यांत GST कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. ‘बेटी बचाव’ अशा फक्त घोषणा देऊन चालत नाहीया बेटीच्या आरोग्याची आणि सक्षमीकरणाची जबाबदारीही सरकारने घेतली पाहिजे.

नागपूरजळगावरत्नागिरीभिवंडीवसई-विरार, सातारा, चंद्रपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, यवतमाळ, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबादअहमदनगरमिरा भाईंदरअमरावती या जिल्हा-शहरांत झालेल्या मोर्चाने पूर्ण देशभरातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रीशक्तीचे प्रदर्शन झाले. आता सॅनिटरी पॅडवरील कर रद्द झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही. ही लढाई विचारांची आहे. ही लढाई स्त्रियांच्या मूलभूत हक्काची आहे.

संबंधित लेख