सत्ताधाऱ्यांनी काहीही कामे न केल्याने मराठवाड्याचा विकास खुंटला – अजित पवार

19 Jan 2018 , 07:14:38 PM

ग्रामपंचायतीमध्ये निवडून न येणारे लोक मोदी लाटेत आमदार झाले. पण सत्ताधाऱ्यांनी काहीही कामे न केल्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटलाअसा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजितपवार यांनी सरकारमधील नेतेमंडळीवर केला. माजलगाव येथे हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत ते बोलत होते.

हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशी पळाला. त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही. पण इथे थोडेसे बिल बाकी असलेल्या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. अशा सरकारला आता जनताच धडा शिकवेलअसे ते म्हणाले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की मराठवाड्यातील पोलीस प्रशासनाला असे वाटते की फडणवीस हे कायम मुख्यमंत्री राहणार आहेत. पण वक्त बदलने मे देर नही लगता... राष्ट्रवादीका भी वक्त आयेगा’ त्यामुळे पोलीस प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देऊ नये. आमचा संघर्ष पोलीस प्रशासनासोबत नाहीतर सरकारसोबत आहेअसे ते म्हणाले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ या सरकारवर ताशेरे ओढताना म्हणाल्या की बेटी पढाओबेटी बढाओ’, अशी जाहिरातबाजी करणार्‍या या सरकारच्या काळात मुलगी घराबाहेर असली की आई-वडिलांचा जीव टांगणीला लागतो. कारण आता कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आले. सध्या राज्यात महिलांवर एवढे अत्याचार झाले आहेत की आज महाराज असतेतर या सत्ताधाऱ्यांचा कडेलोट केला असताअसे त्या म्हणाल्या.

ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे म्हणाले की, भाजपने प्रत्येक वेळी मागासवर्गीय समाजाविरोधात भूमिका घेतली. देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करायच्या होत्यात्यावेळी भाजपने कमंडल’ यात्रा काढली होती. इतकेच नव्हे तर भाजप सरकारने मागासवर्गीय समाजाच्या शिष्यावृत्त्यांची रक्कमही कमी केलीअसे ते म्हणाले.

या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेबीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणेआ. राजेश टोपेआ. सतीश चव्हाणआ. विक्रम काळे-शिक्षक आमदारआ. रामराव वडकुतेमाजी आ. प्रकाश सोळुंके,युवानेते संदिप क्षीरसागरराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटीलमाजी आ. उषाताई दराडेमहिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फडमाजी आ. संजय वाकचौरेराष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळेबीड युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.