राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्य निवडणूक अधिकारी म्हणून माजी विधानसभा
अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केलेली असून त्यांनी पक्षांतर्गत निवडणूक
२०१८-२०करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ११ फेब्रुवारीला
प्राथमिक कमिटी / मतदान केंद्रनिहाय कमिटीची निवडणूक तेथील पदाधिकारी व कार्यकारिणी
सदस्य यांच्यासाहित घेतली जाईल. १८ फेब्रुवारीला पंचायत निवडणूक / शहर किंवा
विभागीय कार्यकारिणी निवडणुका तेथील अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांच्यासाहित ब्लॉक
/ तालुका वर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जातील. २५
फेब्रुवारीला विधानसभा मतदारसंघ निहाय तसेच तालुका / ब्लॉक कार्यकारिणी / अध्यक्ष
व अन्य पदाधिकारी यांच्यासाहित तसेच जिल्हा वर पाठविणारे प्रतिनिधी त्याचबरोबर
प्रदेश वर पाठविण्यात येणारे प्रतिनिधी यांची निवडणूक होईल. ४ मार्च रोजी जिल्हा
कार्यकारिणी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांची निवडणूक होईल. ११ मार्चला मुंबई
विभागीय कमिटीचे अध्यक्ष किंवा अन्य पदाधिकारी यांच्यासाहित कार्यकारिणी निवडणूक
घेण्यात येईल. तर १८ मार्चला राज्याची कार्यकारिणी, अध्यक्ष व अन्य पदाधिकारी
तसेच राज्य निवडणूक मंडळावर जाणारे प्रतिनिधी, राष्ट्रीय
परिषदेवर राज्यातून पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक होईल.
नाशिक जिल्ह्यात 'महाविद्यालय तेथे शाखा' अभियानांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात साडेचारशे शाखांची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थीनींचा या अभियानातील सहभाग लक्षणीय आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळू शकणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. यापुढे संघटनेचे दहा लाख सभासद करण्याचे उद्दिष ...
पुढे वाचामहाराष्ट्रातील खासगी तसेच विद्यापीठ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राज्यातील १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत ८५ टक्के जागा राखीव ठेवल्या जाव्यात, या मागणीसह वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे व आ. डॉ. समीर दलवाई यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्य ...
पुढे वाचानागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली. ...
पुढे वाचा