पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू

05 Feb 2018 , 09:42:35 PM

पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही सक्षम चेहरा नसतानाही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमार्फत पक्षाला पुनरूज्जिवीत करण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत आज प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यात १६ ठिकाणी शाखा उद्घाटन करण्यात आले.

तालुक्यात पक्षाला नेतृत्व नसताना प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांच्याकडून होत असलेली कार्यकर्ता पेरणी बघून लोकांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. वेळोवेळी आंदोलन, विद्यार्थांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन या वेळी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी सर्वांचं कौतुक केले व भविष्यातही अशाच कामाची अपेक्षा ठेवली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश बनसोडे, शहराध्यक्ष संकेत घोगरदरे, अक्षय कसबे, फैजल इनामदार, अंकुश गायकवाड, सतीश मलशेट्टी, अभिजित साळुंखे, अनिकेत कापसे, गणेश घोडके, जय देशमाने, सागर पडवळ आदींसह विद्यार्थी सहकारी व ज्येष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती.

संबंधित लेख