ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...; छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना आर्त हाक

23 Feb 2018 , 08:37:01 PM

ताई, आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्याप राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी ताईंना भेट दिली.

राजश्रीची विनंती ऐकल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली. तसेच आमचे नेते विधिमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगावहून रावेरसाठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.

या वेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की "सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. पिकविमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दूरच राहिली."

त्या मुलीने दिलेली केळी ताई, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व इतर नेत्यांनी खाऊन मुलीची समजूत काढत तिच्या पालकांना धीर देत रावेर येथील सभेसाठी पुढे मार्गक्रमण केले.

संबंधित लेख