खा. सुप्रिया सुळे बुधवारपासून संवाद दौऱ्यावर

19 April 2017

Jalgaon, Dhule, Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तीन दिवसीय संवाद दौऱ्यास आजपासून सुरूवात होत असून दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जळगाव मधील बुद्धिजीवी घटकांशी सुळे यांनी संवाद साधला. पुढील दोन दिवसांत नाशिक व धुळे जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी, महिला व युवती संघटनांशी तसेच विविध समाज घटकांतील लोकांशी त्या संवाद साधणार आहेत.