संघर्षयात्रेचा चौथा व शेवटचा टप्पा १७ मे पासून

17th May 2017

Raigad

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संघर्षयात्रेच्या माध्यमातून राज्यभरात सरकारविरोधात लढा उभा केला. चंद्रपूरपासून सुरु झालेली ही संघर्षयात्रा चौथ्या टप्प्यात सिंधुदुर्गातील बांदा येथे चांदा ते बांदा असा प्रवास पूर्ण करणार आहे. १७ मे व १८ मे या दिवशी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून संघर्षयात्रेच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.