सुप्रिया सुळे यांचा तरूणाईशी संवाद - युवा संवाद यात्रा

10th Oct - 13th Oct 2017

Maharashtra

महाराष्ट्रातील तरूण पिढीशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे युवा संवाद यात्रेअंतर्गत राज्यातील १०० महाविद्यालयांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी तसेच त्यांचे विचार त्या जाणून घेत आहेत. दि. १०, ११, १२ व १३ ऑक्टोबर रोजी त्या अनुक्रमे बीड (महात्मा बसवेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय व बलभीम महाविद्यालय), औरंगाबाद (देवगिरी महाविद्यालय व स.भु.महाविद्यालय), जळगाव (नुतन मराठा महाविद्यालय व किसान महाविद्यालय), धुळे (झेड बी पाटील महाविद्यालय) व नाशिक (सपकाळ नॉलेज हब) येथे भेट देणार आहेत.

युवा संवाद यात्रेच्या याआधीच्या टप्प्यात त्यांनी अहमदनगर, कर्जत, करमाळा, पंढरपूर, सांगोला, तासगाव, जयसिंगपूर, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा व वाई येथील महाविद्यालयांना भेट दिली होती.