१ ते ११ डिसेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा पायी ‘हल्लाबोल’

1-11 December 2017

Maharashtra

येत्या १ ते ११ डिसेंबर दरम्यान या नाकर्त्या सरकारच्या निषेधार्थ यवतमाळ ते नागपूरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'हल्लाबोल' पदयात्रा काढण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी, १२ डिसेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वात नागपूर येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या आंदोलनाआधी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी कराड येथे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात एक व्यापक आंदोलनाला सुरुवात झाली. २५ ते ३० तारखेपर्यंत राज्यातील इतर भागात कार्यकर्त्यांकडून हा हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.