१५ ते २१ फेब्रुवारी : उत्तर महाराष्ट्रात ‘हल्लाबोल’चा तिसरा टप्पा

15 Feb 2018 11.00

Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर महिन्यात हल्लाबोल पदयात्रा (विदर्भ) आणि जानेवारी महिन्यात हल्लाबोल मराठवाडा आंदोलन केले. लोकांचा दोन्ही टप्प्यात आंदोलनाला उदंड प्रतिसाद लाभला. पक्षाने हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातील श्रीगोंदा (अहमदनगर)पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान हे आंदोलन होणार आहे. १० मार्च रोजी नाशिक येथे या राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आंदोलनाच्या टप्प्याचा समारोप होईल.