अजितदादांचा दिवाळी धमाका

कोरोनामुक्त झाल्यानंतर अजितदादांचा दिवाळी धमाका

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज

महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अजितदादांनी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये उडी घेतली आहे. दादांनी राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गोड भेट दिली आहे. एस. टी कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचा ठाम निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी कामात पुन्हा रुजू झाल्यानंतर घेतला आहे. ऐन दिवाळीच्या वेळी राज्यातील एस. टी कर्मचारी बांधवांना हे पॅकेज देऊन अजितदादांनी हा दिवाळीचा धमाका उडवून दिला आहे.