राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस श्रीमती रुपालीताई चाकणकर, प्रदेशाध्यक्षा

महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत महाराष्ट्रातील महिलांचे राजकीय व सामाजिक भान वाढावे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसने विशेष प्रयत्नांती आपला ठसा उमटवला आहे. संविधान बचाओ आंदोलनांपासून ते महिलांवरील प्रश्नांवर राष्ट्रवादी महिला काँग्रेस सातत्याने भूमिका घेऊन महिलांचा आवाज बुलंद करत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री. मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष, श्री. रविकान्त वर्पे, कार्याध्यक्ष, श्री. सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही महाराष्ट्रातील अतिशय जोमदार युवा संघटन म्हणून पुढे आलं. पवारसाहेबांनी नव्या दमाच्या तरुणांमधून नेतृत्वाला संधी देण्याचे व्यासपीठ म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपल्या अभिनव आंदोलनांनी मोठं अभिसरण घडवून आणलं आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस राष्ट्रवादी युवती काँग्रेस कुमारी सक्षणा सलगर, प्रदेशाध्यक्षा

खासदार सुप्रियाताईंच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या युवतींनी लोकजागर करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराला आगळी दिशा मिळाली. राजकारण व समाजकारणातील युवतींच्या सहभागाने राजकीय क्षितिजावर नव्या समीकरणांची नांदी निनादू लागली.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग श्री. जयदेव गायकवाड, राज्यप्रमुख

फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाने आपली बहुजनवादी पुरोगामी भूमिका आग्रहाने समाजात रुजवली.
राष्ट्रवादी किसान सभा राष्ट्रवादी किसान सभा श्री. शंकर अण्णा धोंडगे, राज्यप्रमुख

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सामाजिक जाणिवांतून सातत्यपूर्ण काम करत त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे काम राष्ट्रवादी किसान सभा करत आली आहे.
राष्ट्रवादी ओबीसी विभाग राष्ट्रवादी ओबीसी विभाग श्री. ईश्वर बाळबुधे

नवा समाजपोत घडवताना इतर मागासवर्गीय समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने भूमिका घेतली.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग श्री. अब्दुल गफ्फार अब्दुल रज़ाक मलिक, राज्यप्रमुख

राज्यातील अल्पसंख्याक समाजांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून अल्पसंख्याक समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.
राष्ट्रवादी भटके विमुक्त अनुसूचित जाती-जमाती विभाग राष्ट्रवादी भटके विमुक्त अनुसूचित जाती-जमाती विभाग श्री. हिरालाल राठोड, अध्यक्ष

समाजातील भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत राहून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे महत्त्वाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विभाग करतो.
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल डॉ. नरेंद्र काळे, राज्यप्रमुख

महाराष्ट्राच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने भूमिका घेऊन डॉक्टरांसारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्तींना सामाजिक व राजकीय प्रवाहात आणून आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचा एक उत्तम पायंडा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातून पाडला गेला.
राष्ट्रवादी अपंग विभाग राष्ट्रवादी अपंग विभाग श्री. सुहास तेंडुलकर, राज्यप्रमुख

शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीतील घटकांसाठी सातत्याने कार्यरत असा हा विभाग.
राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेल राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेल श्री. बाबासाहेब पाटील, अध्यक्ष

चित्रपट आणि नाट्य कलावंत, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणारे कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. श्री. बाबासाहेब पाटील आणि त्यांची टीम या क्षेत्रातील लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श्री सुनील गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सेवा आणि संघर्ष हे ब्रीद घेऊन कार्य करते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करण्यासाठी सेलद्वारे अनेक अभिनव उपक्रम राबविले जातात. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची टीम विद्यार्थ्यांच्या विकासाच्या उद्देशाने कार्यरत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्या हक्कांसाठी प्रसंगी व्यवस्थेविरूद्ध लढा देऊन न्याय देण्यावर विश्वास ठेवते.
सेवा दल सेवा दल श्री. दीपक मानकर, प्रदेशाध्यक्ष

नवे केडर बांधून पक्षाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी सेवा दल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. राष्ट्रवादीची विचारसरणी तळागाळात पसरवण्यासाठी सेवा दल अत्यंत महत्त्वाचा फोर्स म्हणून कार्यरत आहे. सेवा दलामार्फत ग्रामपातळीवर पक्षाच्या कार्यास आणि कल्पनांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे पक्षासाठी अनुयायी वाढण्यास मदत झाली आहे. सेवा दल अनेक सामाजिक-सांस्कृतिक कार्यात पक्षाचे प्रतिनिधित्व करते.
वक्ता प्रशिक्षण सेल वक्ता प्रशिक्षण सेल श्री प्रदिप सोळुंके, प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सेलमार्फत वक्ता प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले जाचे. सार्वजनिक पातळीवर सक्षम व प्रभावी वक्तृत्वाद्वारे पक्षाची व नेतृत्वाची प्रतिमा वर्धित करण्याच्या प्रमुख बाबींची पूर्तता या सेल मार्फत केली जाते. सेल नवीन पक्ष कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतोच शिवाय बुथ समित्यांचे प्रशिक्षण देखील करतो. या कक्षाचे अध्यक्ष श्री. प्रदीप सोळुंके हे त्यांच्या पुरोगामी विचारांसाठी प्रख्यात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वक्ता प्रशिक्षण सेल जोमाने कामगिरी करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस लायब्ररी सेल राष्ट्रवादी काँग्रेस लायब्ररी सेल श्री. उमेश रावसाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष

ग्रंथालय सेल शाळा व महाविद्यालयांतील यूपीएससी-एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेशी ग्रंथसूची व अभ्यासाची पुस्तके तसेच अभ्यासिकांसंदर्भात मार्गदर्शनासह योग्य ती मदत करतो. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या एकमेव उद्देशाने हा कक्ष कार्यरत आहे. श्री. उमेश रावसाहेब पाटील हे या विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी लिगल सेल अ‍ॅड. श्री आशिष देशमुख, प्रदेशाध्यक्ष

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सायबर-गुन्ह्यांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन हे गुन्हे ओळखण्यासाठी व कमी करण्यासाठी लिगल सेलची स्थापन केला. या कायदेशीर कक्षाने सायबर क्राइमची अनेक प्रकरणे नोंदवून पोलिस खात्याकडे पाठपुरावा करून सोडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अ‍ॅड. आशिष देशमुख यांना या कक्षाचा कार्यभार देण्यात आला आहे.