Slide


विधानमंडळ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज, खताचा अतिरिक्त साठा करण्यासाठी निधी पुरवठ्याची व्यवस्था केली. तसेच जलक्षेत्रातील सुधारणा, टिकाऊ सिंचन, चारा क्षेत्राच्या विकासासंदर्भातील प्रमुख शेती विकास उपक्रमासंदर्भात राज्य संसाधन निर्देशित केले. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड (बीएचटीपीएल) महिला सशक्तीकरण क्षेत्रीय समृद्धी कशी वाढवू शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रातील वीज निर्मितीसाठी ऊर्जा सबसिडी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, 'क' श्रेणी नगरपरिषदांमध्ये रोजगार हमी योजनेचा विस्तार हे दादांचे महत्त्वाचे योगदान. मासेमारी क्षेत्रात बंदर विकासासाठी, मासेमारीच्या नौका यंत्रणा आणि महाराष्ट्राच्या समुद्री अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मासेमारीचा प्रचार आणि विपणन करण्यावर भर दिला आहे.
त्यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्रातील गुटखा, पान मसाला आणि अन्य तंबाखूशी संबंधित उत्पादनांवर बंदी घालण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात हृदयरोपण यंत्रांसाठी विशेष तरतूद, अपंगांसाठी कमी व्याज दराने ब्रेल घड्याळ तसेच वाहनांवरील व्हॅट रद्द करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. तांदूळ कोंडा, हातपंप आणि पाणी मीटरला करमुक्ती दिली. त्यांनी जीवनावश्यक वस्तू, सुकामेवा व चहावरील करात ही सवलत सुरू केली. कमी वेतन असलेल्या निम्न सामाजिक-आर्थिक वर्गाला कुटुंबाचे पालनपोषण करता यावे म्हणून दादांनी विशेष प्रयत्न केले.

ना. अजितदादा पवार


महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कॅबिनेट मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य
सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा पुढे चालवत अतिशय यशस्वीपणे सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था, टेक्स्टाइल पार्क यांची उभारणी. सलग सहावेळा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी. आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी. सलग नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. २००८ साली त्यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच राज्याचे ग्रामविकासमंत्री म्हणून समर्थपणे काम केलं. आज महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
ना. जयंत पाटील


राज्यसभा सदस्य, माजी नागरी उड्डाण आणि अवजड उद्योग मंत्री, भारत सरकार

राजस्थानमधील सांभर तलावाजवळ जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. या प्रकल्पातून अंदाजे चार हजार मेगावॅट वीज निर्मिती होईल जी भारताच्या पारंपरिक ऊर्जा क्षमतेपेक्षा चौपट असेल. भारतीय हवाई क्षेत्रात आपले कठोर परिश्रम व दृढनिश्चियाने त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. भारतीय हवाई क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या. भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रात असे सकारात्मक बदल आणि परिवर्तन त्यांनी घडवले जे देशाने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.

खा. प्रफुल पटेल यांना २००५ साली कॅपा ( सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमान वाहतुक क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देणाऱ्या एशिया पॅसिफिक प्रभागातील नागरी उड्डाण मंत्र्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. तसेच इंडिया टुडे या देशातील नामांकित वृत्तसमूहाने २००६ साली प्रफुल पटेल यांचा देशातील प्रथम क्रमांकाचे मंत्री म्हणून गौरव केला, तर २००७ साली इकॉनॉमिक टाइम्स रिफॉर्मर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
खा. प्रफुल पटेल


कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य
त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.ची स्थापन झाली. महाराष्ट्राच्या संगणक साक्षरतेला नवा आयाम मिळाला. तसेच त्यांनी महाराष्ट्र विद्युत मंडळाचे विभाजन होऊन चार वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या व वीज निर्मितीपासून वीज वितरणापर्यंत महाराष्ट्रात नवा अध्याय लिहिला गेला.
ना. दिलीप वळसे पाटील


ज्येष्ठ नेते व प्रथम प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक वितरण विभाग
सार्वजनिक बांधकाम खाते, पर्यटन विकास अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी यशस्वीपणे काम केलं. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट तसेच अखिल भारतीय समता परिषदेची स्थापना करून त्यांनी शिक्षण तसेच सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात आपलं योगदान दिलं.
ना. छगन भुजबळ


लोकसभा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सातत्याने उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, पटलावर मांडलेली खासगी विधेयके या सर्वच वर्गामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे सातत्याने सुप्रियाताई संदररत्न पुरस्काराच्या मानकरी ठरत आहेत. अत्यंत वेगाने कामाचा निपटारा करणाऱ्या नेत्या. प्रशासकीय कामकाजाच्या दिरंगाईतून व्यवस्थापकीय प्रभावशैलीचा वापर करत लोकाभिमुख परिणाम सिद्ध करून दाखवणारे नेतृत्व.

पक्ष संघटनेत सुप्रियाताई अतिशय बारकाईने नजर ठेवून असतात. देशभरात सर्वप्रथम युवतींचे स्वतंत्र संघटन करून सामाजिक प्रश्नांवर जागर घडवून आणण्याचं श्रेय सुप्रियाताईंना जातं. राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांची जबाबदारी त्या उत्तमरीत्या पाहतात.
खा. सुप्रियाताई सुळे


सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री या भूमिकेतून प्रतिकूल कोविडचे आव्हान पेलून त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकली. कोरोना महामारीत काही रुग्णालयांच्या नफेखोरीला त्यांनी आळा घातला. औषधांच्या किमती आटोक्यात ठेवल्या, चाचण्या स्वस्तात उपलब्ध कमी करून दिल्या. आघाडीच्या आधीच्या काळात उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. सामान्य प्रशासन राज्यमंत्री, ऊर्जा खात्याची जबाबदारी, उच्च शिक्षण खाते ते आज सार्वजनिक आरोग्य अशा विविध खात्याची कामगिरी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे.
श्री. राजेश टोपे


गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. अनिल देशमुख नागपूरजवळच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. ११९२ सालापासून नरखेड पंचायत समितीचे सभापती, तीन वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात तसेच सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत.
ना. अनिल देशमुख