महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ माझ्याशी आहे – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. सुसुळेंनी इंदापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

 

महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. पण संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महिलांचा आत्मविश्वासही वाढवला. राम कदम यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी आली. तसेच सुप्रिया सुळेंनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत फडणवीस अद्याप गप्प का? जवाब दो, असे आव्हान दिले.