सहकार महर्षी राजारामबापू पाटील यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा पुढे चालवत अतिशय यशस्वीपणे सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण संस्था, टेक्स्टाइल पार्क यांची उभारणी. सलग सहावेळा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी. आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी. सलग नऊवेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. २००८ साली त्यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच राज्याचे ग्रामविकासमंत्री म्हणून समर्थपणे काम केलं. आज महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत.

लोकसभा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सातत्याने उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, पटलावर मांडलेली खासगी विधेयके या सर्वच वर्गामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे सातत्याने सुप्रियाताई संदररत्न पुरस्काराच्या मानकरी ठरत आहेत. अत्यंत वेगाने कामाचा निपटारा करणाऱ्या नेत्या. प्रशासकीय कामकाजाच्या दिरंगाईतून व्यवस्थापकीय प्रभावशैलीचा वापर करत लोकाभिमुख परिणाम सिद्ध करून दाखवणारे नेतृत्व.
पक्ष संघटनेत सुप्रियाताई अतिशय बारकाईने नजर ठेवून असतात. देशभरात सर्वप्रथम युवतींचे स्वतंत्र संघटन करून सामाजिक प्रश्नांवर जागर घडवून आणण्याचं श्रेय सुप्रियाताईंना जातं. राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांची जबाबदारी त्या उत्तमरीत्या पाहतात.

महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री या भूमिकेतून प्रतिकूल कोविडचे आव्हान पेलून त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकली. कोरोना महामारीत काही रुग्णालयांच्या नफेखोरीला त्यांनी आळा घातला. औषधांच्या किमती आटोक्यात ठेवल्या, चाचण्या स्वस्तात उपलब्ध कमी करून दिल्या.
आघाडीच्या आधीच्या काळात उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. सामान्य प्रशासन राज्यमंत्री, ऊर्जा खात्याची जबाबदारी, उच्च शिक्षण खाते ते आज सार्वजनिक आरोग्य अशा विविध खात्याची कामगिरी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे.