श्रीमती विद्याताई चव्हाण, प्रदेशाध्यक्षा
श्रीमती. विद्याताई चव्हाण यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या पक्षात विशेषत: मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील वंचित घटकांची सेवा आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करत होत्या. २००७ मध्ये त्या मुंबईतील प्रभाग क्रमांक 36 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. २०१० मध्ये त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०११ मध्ये त्या विधान परिषदेच्या सदस्य झाल्या आणि २०२० पर्यंत त्या पदावर कार्यरत होत्या. आता ५ मे २०२२ रोजी त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्याताई या पवार साहेबांचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन महिला सक्षमीकरणाच्या ध्येयासाठी सतत कार्यरत आहेत. महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवत आहेत. यापुढील काळातही महिलांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

श्री. सुनील गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सेवा आणि संघर्ष हे ब्रीद घेऊन कार्य करते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करण्यासाठी सेलद्वारे अनेक अभिनव उपक्रम राबविले जातात. राष्ट्रावादी विद्यार्थी काँग्रेस टीम विद्यार्थ्यांच्या विकासाच्या उद्देशाने कार्यरत आहे आणि प्रत्येक विद्यार्थास त्यांच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन न्याय देण्यावर विश्वास ठेवते.

कुमारी सक्षणा सलगर, प्रदेशाध्यक्षा
खासदार सुप्रियाताईंच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या युवतींनी लोकजागर करायला सुरुवात केली. खासदार सुप्रियाताईंच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या युवतींनी लोकजागर करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराला आगळी दिशा मिळाली. राजकारण व समाजकारणातील युवतींच्या सहभागाने राजकीय क्षितिजावर नव्या समीकरणांची नांदी निनादू लागली.

श्री. कल्याण आखाडे
नवा समाजपोत घडवताना इतर मागासवर्गीय समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने भूमिका घेतली.

अॅड. मोहम्मद खान पठाण, राज्यप्रमुख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करून अल्पसंख्यांक विभागात, संकल्पिय सक्षमीकरण कामगिरी करत आहे. आमचे आदर्श व प्रेरणास्थान व मार्गदर्शक नेते राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अल्पसंख्याक समाजाप्रती असलेले त्यांचे ध्येय व धोरण राबवित अल्पसंख्यांक समाजाच्या तळागाळातील सर्व घटकांपर्यंत सामाजिक व राजकीय संधी देत समाजातील भावना समजून त्या निवारण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करून अल्पसंख्याक विभागात, संकल्पीय सक्षमीकरण कामगिरी करत आहे.

अॅड. जयदेव गायकवाड, राज्यप्रमुख
राष्ट्रवादीची बहुजनवादी पुरोगामी भूमिका आग्रहाने समाजात रुजवली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेऊन राष्ट्रवादीची बहुजनवादी पुरोगामी भूमिका आग्रहाने समाजात रुजवली.

डॉ. जानबा शंकरराव मस्के, राजेंद्र लावंघरे देशमुख
डॉ. जानबा शंकरराव मस्के यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या सेवादल प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. १९८५ पासून राष्ट्रीय काँग्रेस सेवादलात त्यांनी वॉर्ड अध्यक्षापासून आपल्या कार्याला सुरुवात केली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलात नागपूर अध्यक्ष पदी डॉ. जानबा मस्के यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर पुढील काळात प्रदेश प्रशिक्षक, मुख्य संघटक, प्रदेश कार्याध्यक्ष या पदांवर त्यांनी सेवादलात कामकाज केले. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलाचा शिस्तप्रिय कार्यक्रम प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. जानबा शंकरराव मस्के कटिबध्द राहणार आहेत. सेवादलाच्या माध्यमातून अनुशासित व प्रशिक्षित कार्यकर्ता तयार करणे हा सेवादलाचा मानस असणार आहे. डॉ. जानबा शंकरराव मस्के हे पवार साहेबांचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन लोकसेवसाठी सक्षम कार्यकर्त्यांची फळी राज्यभर तयार करून राष्ट्रवादी विचारसणीचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. श्री राजेंद्र लावंघरे देशमुख यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस फादर बॉडीची सरचिटणीस, सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक ,त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष, व त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवा दलाचे मुख्य संघटक, नंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष असा मोठा कार्यकाळ त्यांचा आहे.

श्री. हिरालाल राठोड, राज्यप्रमुख
समाजातील भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत राहून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे महत्त्वाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विभाग करतो.

डॉ. सुनील जगताप, राज्यप्रमुख
डॉ. समीर हसन दलवाई, राज्य समन्वयक
महाराष्ट्राच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने भूमिका घेऊन डॉक्टरांसारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्तींना सामाजिक व राजकीय प्रवाहात आणून आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचा एक उत्तम पायंडा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातून पार पाडला गेला.

श्री. बाबासाहेब पाटील, अध्यक्ष
चित्रपट आणि नाट्य कलावंत, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणारे कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. श्री. बाबासाहेब पाटील आणि त्यांची टीम या क्षेत्रातील लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

श्री उमेश रावसाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष
ग्रंथालय सेल शाळा व महाविद्यालयांतील यूपीएससी-एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेशी ग्रंथसूची व अभ्यासाची पुस्तके तसेच अभ्यासिकांसंदर्भात मार्गदर्शनासह योग्य ती मदत करतो. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या एकमेव उद्देशाने हा कक्ष कार्यरत आहे. श्री. उमेश रावसाहेब पाटील हे या विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

ऍड. श्री. आशिष देशमुख, प्रदेशाध्यक्ष
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सायबर-गुन्ह्यांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन हे गुन्हे ओळखण्यासाठी व कमी करण्यासाठी लिगल सेलची स्थापना केली. या कायदेशीर कक्षाने सायबर क्राईमची अनेक प्रकरणे नोंदवून पोलीस खात्याकडे पाठपुरवठा करून सोडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ॲड. आशिष देशमुख यांना या कक्षाचा कार्यभार देण्यात आला आहे.