राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड

30 Jun 2018 , 10:00:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने विद्यमान अध्यक्ष सचिन अहिर यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड जाहीर करण्यात आली.

संबंधित लेख