पावसाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ सज्ज, नागपूरात जंगी स्वागत

09 Jul 2018 , 08:29:41 PM

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ शनिवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात विमानतळावर जंगी स्वागत केले. तब्बल अडीच वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.

"प्रत्येक प्रश्न हा त्या त्या घटकासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून मांडण्यात आलेले प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात मांडणे व ते मार्गी लागण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्याकडून देखील जेवढा प्रयत्न होईल तेवढा करेनच. शेतकऱ्यांचे, ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न सभागृहात मांडेन", असे भुजबळ यावेळी म्हणाले.

संबंधित लेख