संभाजी भिडे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी – अजित पवार

10 Jul 2018 , 09:20:07 PM

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेवर विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली. त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे, असे म्हणत त्यांनी संभाजी भिडेच्या वक्तव्याचा समाचार घेतला. समाजातील एकोपा नष्ट व्हावा यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या भिडेचा मास्टर माईंड कोण आहे असा सवाल त्यांनी केला. सरकारने कोणत्याही दबावाला बळी न पडता भिडेवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

संबंधित लेख