सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली - छगन भुजबळ

10 Jul 2018 , 10:03:43 PM

तब्बल अडीच वर्षांच्या काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी विधान सभेच्या कामकाजात सहभाग घेतला. सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.

नाशिक येथून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते. त्यांचे पाय रक्ताळले होते. वनहक्काच्या जमिनीसाठी ते आंदोलन होते. न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना एक आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काही केले नाही, असा आरोप करत त्यांनी सरकारवर तोफ डागली. या सरकारने लोकांना फसवले आहे. एक लाख कोटी रुपयांच्या मागण्या आपण केल्या आहेत. सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे, असाही आरोप त्यांनी केला.

यांनी राज्याला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले, टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील अनेक गावांमध्ये आज वीज नाही. गावागावात वीज पोहोचवू असे आश्वासन सरकारने दिले होते. रिलायन्स एनर्जीचे २ हजार कोटीचे कर देणे बाकी आहे. त्याचे काय, असा प्रश्न विचारत हे सरकार अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योपतींसाठी आहे, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित लेख