मराठी विद्यार्थ्यांवर गुजराती अंमल लादणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध

16 Jul 2018 , 07:27:12 PM

बुलेट ट्रेनच्या वेगाने महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांचं आउटगोइंग गुजरातच्या दिशेने वाढलं. पण गुजराती भाषेचं मात्र इनकमिंग आहे. मराठी भाषेवर गुजरातीचे आघात सुरू झालेत. शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून गुजराती भाषा नाक खुपसतेय. रायगड जिल्ह्यात शासनाच्या वतीने छापण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात काही पाने ही गुजराती भाषेत छापण्याचा पराक्रम सरकारने केला आहे. मराठी विद्यार्थ्यांवर गुजराती अंमल लादणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध!

संबंधित लेख