दूध उत्पादकांबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी - अजित पवार

16 Jul 2018 , 08:50:38 PM

दूध उत्पादक संघ चुकीचं वागत आहे असा अपप्रचार भाजपचे सदस्य करत आहेत. काही झालं की सहकार क्षेत्रावर खापर फोडायचं हे सरकार करत आहे. विधानसभेचे अध्यक्ष खुद्द एका संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांना या क्षेत्रातील अडचणी माहित आहेत. मात्र दूध उत्पादकांचे दुःख भाजपचे लोक समजू शकत नाहीत, असे वक्तव्य विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. दुधाच्या विषयावर सभात्याग करुन विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

इथेही शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे. सभागृहात शिवसेना शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी करत आहे, मात्र सरकारमध्येही सामील होत आहे. शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आहे की नाही हेच स्पष्ट होत नाही, असेही ते म्हणाले.

सरकार दूध संघावर दमदाटी करत आहेत. अनुदान जाहीर केले नाही तर दूध पावडरला मिळणारे अनुदान बंद करू अशी धमकी दिली जात आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
 

संबंधित लेख