भाजपने राज्यात बॅगा संस्कृती आणली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका

27 Jul 2018 , 08:04:19 PM

भाजपने लोकसेवा गुंडाळत राज्यात बॅगा संस्कृती आणली आहे. लोकांचे प्रश्नप, विकास यांच्याशी त्यांचा संबंध राहिला नाही. भाजप हा निवडणूक जिंकण्याचे यंत्र झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथील सभेत केली. सांगली महापालिका क्षेत्रातील मतदार भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की भाजपचे नेते केवळ घोषणा करतात. अनेक आश्वाेसने देतात. मात्र आश्वाासनांची पूर्तता करत नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास ६५०० कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली होती. राज्यात भाजपची सत्ता आली पण सांगली, मिरज, कुपवाड येथील महापालिकेलाही एक दमडी अनुदान दिलेले नाही. भाजपने सत्ता आणलेल्या अन्य शहरांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे भाजप नेते, मंत्र्यांच्या मोठ्या गप्पा आणि आश्वाेसनांना सांगलीची जनता बळी पडणार नाही, असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विजय होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, श्रीनिवास पाटील, प्रभाग क्रमांक सतरामधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार व नागरिक उपस्थित होते.


संबंधित लेख