मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक

30 Jul 2018 , 11:00:45 PM

मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत भावना तीव्र आहेत. आतापर्यंत पाच मराठा आंदोलनकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे. जागोजागी बंद पुकारण्याची भूमिका घेण्यात येत आहे. सरकार मात्र याबाबतीत केवळ आश्वासनं देत वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करून घेत केंद्राला शिफारस करण्यात यावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यासाठी घटना दुरुस्ती व्हावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख