मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत – धनंजय मुंडे

30 Jul 2018 , 11:33:50 PM

संपूर्ण महाराष्ट्रात १८ तारखेपासून मराठा समाजाचे ठोकमोर्चे सुरु आहेत. सरकार विरोधी आक्रोश यातून व्यक्त केला जात आहे. याबाबतीत अनेकदा पक्षाकडून सरकारला सांगण्यात आले आहे की कलम ३०५ व ३५३ चे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. राज्य सरकारला हे वातावरण शांत करायचे आहे की वाढवायचे आहे हेच कळून येण कठीण झाले आहे, असे मत विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. नुकतीच सर्वपक्षीय बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झाली. यात मंत्री महोदय स्वतः गुन्हे मागे घेण्याबाबत बोलले परंतु अद्याप गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्व माध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे सरकारला सांगणे आहे की हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, असे मुंडे म्हणाले.

संबंधित लेख