सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आणखी एक पुरावा, सरकारची पोलखोल करणारा बीबीसी मराठीचा लेख

01 Aug 2018 , 10:28:38 PM

सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. इकडे कर्जमाफीची घोषणा होत नाही तोच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात, चौकाचौकात कर्जमाफीची बॅनरबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चेहरे त्या बॅनर्सवर झळकत होते. सरकारमधील लोक शेतकऱ्यांचे कैवारी कसे आहेत याची जणू मार्केटिंगच केली जात होती. मात्र बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने सरकारची कर्जमाफी कशी फसवी आहे, याची पोलखोल आपल्या ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावातील १३ शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली होती. वर्ष होत आले तरी यातले काही शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. या लेखामुळे सरकारच्या फसव्या कर्जमाफीची पोलखोल होताना दिसत आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी वेळोवेळी केली आहे. हा लेख वाचताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची टीका कशी खरी आहे याची प्रचिती येते.
संपूर्ण रिपोर्ट वाचा: https://www.bbc.com/marathi/india-45007447

संबंधित लेख