राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी श्रीपाद खानोलकर यांची तसेच सचिन खुस्पे यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. लोक उघड उघड पैसे दिल्याचे सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेले आहे हे या घटनेतून स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही. त्यामुळे मंत्रालयातच या अधिका-याची धुलाई करण्यात आल्याची ...
पुढे वाचाराज्यातील लोककलावंत, नाटयकलावंत आणि चित्रपट कलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना दिले.या निवेदनामध्ये कलावंतांच्या महत्त्वाच्या १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान निवेदन स्वीकारताना कलावंतांच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात गणेशोत्सवानंतर सकारात्मक चर्चा करण्याचे आणि राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाला बैठकीला पाचारण करण्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिले.हे निवेदन देता ...
पुढे वाचागुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा पार पडली. या चर्चेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.महात्मा गांधीजींच्या नंतर अहिंसेच्या माध्यमातून विशाल आंदोलन उभे करण्याची किमया मराठा समाजाने करुन दाखवली आहे, अशा शब्दात त्यांनी मराठा मोर्चांची स्तुती केली. सरकारने नोटाबंदीच्या बाबतीत एका दिवसात निर्णय घेतला आणि त्याला देशभक्तीचे वलय दिले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचाही निर्णय झटकन घेऊ ...
पुढे वाचा