राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

07 Aug 2018 , 07:13:30 PM

राष्ट्रवादी युवकचा पश्चिम महाराष्ट्र बुथ कमिटी संकल्प मेळावा पिंपरी-चिंचवड येथे पार पडला. शेवटच्या मतदारापर्यंत पक्षाचे विचार पोहचण्यासाठी बुथ कमिटी सक्षम करणे महत्त्वाचे आहे. वन बुथ फिफ्टीन युथ हा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. असे असताना केलेला संकल्प महिन्याभरात पूर्ण करून पक्षाच्या मागे ताकद उभी करण्याचे काम युवक संघटनेने करावे असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी युवकच्या पश्चिम महाराष्ट्र बुथ कमिटी संकल्प मेळाव्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, पुणे जिल्हापरिषद सदस्य रोहित पवार, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विलासराव शिंदे, अशोक पवार या मान्यवरांसोबत पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख