बीपीसीएलसारख्या रिफायनरी शहराच्या मध्यभागी असणे धोकादायक - सचिन अहिर

08 Aug 2018 , 10:43:44 PM

बीपीसीएलच्या रिफायनरीत झालेल्या भीषण स्फोटामुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या विषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी माहुलगावातील रहिवासी व तिथल्या ट्रांझिट कॅम्पमधील नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी काळजी व्यक्त करत राज्य सरकारने तात्काळ तिथल्या लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली. मुंबईसारख्या अत्याधुनिक शहरात अशाप्रकारचे प्लांट्स असणे शहरासाठी घातक आहे. बीपीसीएल व एचपीसीएलच्या रिफायनरी या परिसरातून स्थलांतरित करता येतील का, ही मागणी आपण राज्य व केंद्र सरकारकडे करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

संबंधित लेख