विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सज्ज

09 Aug 2018 , 10:13:04 PM

राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नेहमीच अग्रणी राहिलेली आहे. याच अनुषंगाने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील २२ महाविद्यालयांमध्ये आपले युनिट सुरू केले आहे व हे काम अविरत सुरू आहे. मुंबईतील नॅशनल कॉलेज, झुनझुनवाला कॉलेज, लाला लजपतराय कॉलेज, निरंजन मजेठिया कॉलेज, खालसा कॉलेज, वालिया कॉलेज, भवन्स कॉलेज, दालमिया कॉलेज, रिजवी कॉलेज, केळकर कॉलेज, हिन्दुजा कॉलेज, ऑरिएन्टल कॉलेज, ऋतम्भरा कॉलेज, ठाकूर कॉलेज व इतर काही महाविद्यालयांमध्ये हे युनिट सुरू करण्यात आले आहे. यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना आपल्या समस्या सक्षमपणे मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तत्पर आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मुंबई विद्यापीठीतील पेपर तपासणीच्या झालेल्या गोंधळाविरोधात तीव्र आंदोलन केले होते. विद्यापीठाच्या गेटला टाळे लावून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले, यासाठी कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. त्याचसोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने वेळोवेळी केले आहे. नुकतेच या विभागाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आपल्या वर्षभरातील कार्याचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडला. पवार साहेबांनी या विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थी कार्यकर्त्यांना प्रत्येक आंदोलनात लाभत असते. आमदार विद्या चव्हाण याही या आंदोलनांमध्ये तसेच रा.वि.काँच्या कामांत उत्साहाने सहभागी होतात. यांच्या मार्गदर्शनाखाली रा.वि.काँचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह या सर्व कामांची आखणी व अमलबजावणी करत असतात. माजी खासदार संजय दिना पाटील, महाराष्ट्र सरचिटणीस अरविंद तिवारी, अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, मुंबई वायव्य जिल्हाध्यक्ष अजिंक्य रावराणे यांची त्यांना मोलाची साथ लाभते. अशाच पद्धतीने मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सज्ज असल्याचा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख