गोवंडीच्या घटनेला महापालिका व महाराष्ट्र सरकार जबाबदार - जयंत पाटील

13 Aug 2018 , 06:09:40 PM

गोवंडीच्या उर्दू शाळेत आयर्न सप्लिमेंट देताना त्यातून विषबाधा झाली. यात एका मुलीचा मृत्यू झाला ही अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेला महापालिका व महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ही केंद्र सरकारची योजना जरी असली तरी गोळ्या कोठून मागवल्या जातात याची जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. जर खरेदी केलेल्या गोळ्यांतच भेसळ असेल तर या मुलांचे प्राण हकनाक गेल्याची जबाबदारी महापालिकेची व महाराष्ट्र सरकारची आहे. ही घटना कशी घडली त्याचसोबत इतर शाळेत या गोळ्यांचे वाटप झाले आहे का याची पहाणी करून घडलेल्या प्रकरणावर प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित लेख