अल्पसंख्याक मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या - आ. जितेंद्र आव्हाड

13 Aug 2018 , 06:27:53 PM

महानगरपालिकेमध्ये भेसळयुक्त औषधं येणे, याचाच अर्थ या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारयुक्त भेसळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. या भ्रष्टाचारामुळे एका गरीब अल्पसंख्याक घरातील चिमुकलीचा जीव गेला ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. गोवंडीत महापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला त्यावर आव्हाड यांनी महानगरपालिकेला खडे बोल सुनावले. या अल्पसंख्याक मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच या मुलीच्या पालकांना नोकरी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. ज्या विभागामार्फत या गोळ्या महानगरपालिकेत आणल्या त्या विभागाच्या प्रमुखास निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख