संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड

13 Aug 2018 , 06:51:52 PM

देशात संविधान जाळण्याचा हीन प्रकार घडला आहे. ७० वर्षात संविधान जाळण्याची कुणाची हिम्मत झाली नव्हती. ज्या संविधानाच्या माध्यमातून मनुस्मृती गाडली गेली ते संविधान जाळण्याचे काम आज झाले, अशा शब्दांत आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिल्लीत घडलेल्या घटनेचा निषेध केला.

सरकारमधील लोकांचा आरक्षणाविरोधी सूर आहे, त्यामुळेच हे केले गेले. सरकार समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम करत आहे. संविधान जाळण्यामागे सरकारचा आणि त्यांच्या समर्थकांचाच हात आहे. संविधान जाळणे हा देशद्रोह आहे. ज्यांनी संविधान जाळले त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख