राजधानीत सर्वपक्षीय युवा संघटनांची सरकारविरोधात मोर्चेबांधणी

13 Aug 2018 , 07:01:23 PM

राजधानी नवी दिल्ली येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षातील युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेचे प्रमुख मा. धीरज शर्मा उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. देशातील बेरोजगारीमुळे तरुण बेजार झाला आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक आश्वासने देणारे हे सरकार लोकांना ‘बुरे दिन’ दाखवत आहे. सामान्य जनतेला या सरकारचा वीट आला आहे. देशभरात असंतोषाचे वातावरण असताना, लोकांच्या दुःखाला वाचा फुटावी यासाठी सर्वपक्षीय युवा नेतृत्वाने पुढाकार घेतला आहे. या अकार्यक्षम सरकारविरोधी मोर्चेबांधणी करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्याचप्रमाणे काँग्रेस समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व इतर संघटनेचे युवा प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख