दोन आठवड्यात रायगड जिल्ह्यातील १०० टक्के बुथ कमिट्या स्थापन करणार! – सुनील तटकरे

13 Aug 2018 , 07:26:25 PM

आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर बुथ कमिट्यांशिवाय पर्याय नाही. बुथ कमिट्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात निवडणुकांचे सूक्ष्म स्वरूपाचे नियोजन करायचे आहे. म्हणून येत्या दोन आठवड्यात रायगड जिल्ह्यातील १०० टक्के बुथ कमिट्या स्थापन केल्या जातील, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केला. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला गेला होता, त्यावेळी ते बोलत होते. बुथ कमिटीच्या बांधणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी असे आवाहन त्यांनी केले.

या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कोकण विभागीय बुथ कमिटी संकल्प मोळावा लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे घेणार असल्याची माहिती दिली. यावेळी आमदार सुरेश लाड, अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आणि असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख