प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हाध्यक्षांसोबत व्हर्च्युअल संवाद

16 Aug 2018 , 09:07:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत तसेच जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यानुसार आधुनिकतेची विचारसरणी जोपासणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादी Connect कार्यक्रमांतर्गत पक्षाच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांसोबत CDN प्रणालीद्वारे व्हर्च्युअल संवाद साधला.

यादरम्यान पक्षाच्या कामगिरीबद्दल मार्गदर्शन व इतर योजनांचे त्यांनी विश्लेषण केले. जिल्हाध्यक्षाने बुथ कमिटीशी संपर्क साधावा व त्यांची बांधणी चोख करावी. कोणताही ढिला कारभार होणार नाही याची काळजी घ्यावी. पक्षाने काढलेल्या ॲपचा वापर करून प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क कसा होईल याचीही चर्चा यादरम्यान करण्यात आली. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जिल्हाध्यक्षाने जिल्हास्तरावर पत्रकार परिषद घेण गरजेचे आहे. वैचारिक शिबीर घेण्यास भर द्यावा यातून पक्षाची भूमिका लोकांना समजण्यासाठी मदत होईल, अशा सूचनाही त्यांनी दिला.

जिल्हाध्यक्षांनीही आपल्या मनातील प्रश्न प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचवण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर केला. अनेकांनी आपले प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मात्र सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत प्रदेशाध्यक्षांसोबत थेट व्हीडिओ द्वारे संवाद साधला. यावेळी सरचिटणीस प्रभाकर सावंत, सेवादल अध्यक्ष बाळकृष्ण कामत, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, ओबीसी सेल अध्यक्ष राज राजापूरकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, कार्याध्यक्ष रमेश दोडके, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष रामदास खोसे, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, समीर भोईर, निलेश फडतरे, कार्यालयीन सचिव कल्पेश मिठबावकर, राकेश देवरे, सचिन पंडीत, शंकर पावणे, जावेद शेख, निरज तांडेल, विकास साळुंखे यांनीही उपस्थित राहून आपले प्रश्न प्रदेशाध्यक्षांना विचारले.

संबंधित लेख