प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 'राष्ट्रवादी Connect' विदर्भ दौऱ्याची सुरुवात

16 Aug 2018 , 10:46:01 PM

वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 'राष्ट्रवादी Connect' विदर्भ दौऱ्याची सुरुवात झाली. सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन पक्षाला आणि कार्यकर्त्यांना नक्कीच उर्जा मिळेल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवक प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, नेते किशोर माथनकर, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल घोडे उपस्थित होते.

संबंधित लेख