कार्यकर्त्यांनी बूथ कमिट्यांवर भर द्यावा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चंद्रपूरात कार्यकर्त्यांसोबत संवाद

18 Aug 2018 , 05:50:42 PM

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाला चंद्रपूर येथून सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. आजचा कार्यक्रम सुरू होण्याआधी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पक्ष बळकट करायचा असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मत करायला हवी. नैराश्याची भावना मनातून काढून टाका, सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्याची मानसिकता तयार करा, असे म्हणत प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना बळ दिले. यश मिळवण्यासाठी पक्ष वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला बुथ कमिट्यांवर भर द्यायला हवा. याच बुथ कमिट्यांच्या ताकदीवर आपण जनतेशी जोडले जाणार आहोत. प्रत्येक सेल पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. प्रत्येक समाजाला न्याय देणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांनी एकसंध राहून पक्षासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या देशातले सर्व घटक भाजपवर नाराज आहेत. त्यांना भाजप नेतृत्वावर भरोसा राहिलेला नाही. अशा काळात आपण जनतेसाठी संघर्ष करायला हवा, असे ते म्हणाले.

यावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, ओबीसी सेल राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी शहराध्यक्ष दिपक जैस्वाल, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, माजी महिला जिल्हाध्यक्ष शोभा पोटदुखे, युवक अध्यक्ष नितीन मटारकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख