वैभव राऊत, सचिन अंदुरेसारखे सनातनचे आणखी किती लोक राज्यात आणि देशात पसरले आहेत? - जयंत पाटील

20 Aug 2018 , 06:28:38 PM

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात सरकारला पाच वर्षांनंतर यश आले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कलबुर्गी, पानसरे या सगळ्यांचीही हत्या यांनी केली का?  असा प्रश्न उपस्थित केला. आणखी किती जणांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता, हे स्पष्ट झाले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. वैभव राऊत आणि सचिन अंदुरे सारखए सनातन संस्थेचे आणखी किती लोक राज्यात आणि देशात पसरले आहेत, याचा खुलासा व्हायला हवा, अशीही मागणीही त्यांनी केली. ही कृत्ये ज्याच्या आशीर्वादाने सुरू आहेत, त्यांच्यापर्यंत सरकारने पोहचायला हवे, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख