राष्ट्रवादी कनेक्ट विदर्भ दौऱ्याची भंडारा येथे सांगता

20 Aug 2018 , 07:05:53 PM

राष्ट्रवादी कनेक्ट या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या विदर्भ दौऱ्याची भंडारा येथे सांगता झाली. या दौऱ्यात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागातील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्षांनी संवाद साधला. एकंदरीत कार्यकारिणीचा आढावा घेतला. या काळात डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. जयंत पाटील  यांनी भंडारा येथे पत्रकार परिषद घेतली.

या पाच दिवसांच्या दौऱ्यात चार वर्षांत सरकारकडून काही कामे झाले नाही असे स्पष्ट झाले आहे. या भागात नीट रस्ते नाही, शेतकऱ्यांना हमीभाव नाही, अवैध दारु पुरवठा सुरू आहे, सरकारने चार वर्षांत कोणतीही नवी योजना आणली नाही. संपूर्ण देशात महागाई बोकाळली आहे. लोकांचा रोजगार गेला नोटाबंदीमुळे. रुपयाचे अवमूलन झाले. एकंदरीत देश आर्थिक संकटात आला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

राज्यात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत होते. या सरकारने आश्वासने दिले पण ती पूर्ण केली नाही म्हणून सर्व समाजात असंतोष वाढला आहे. मराठा समाज, धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. हे सरकारच्या चुकीमुळेच घडले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख