सनातनची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने आता तरी जागे व्हावे – नवाब मलिक

20 Aug 2018 , 11:28:21 PM

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपास आणि अटकसत्रात वैभव राऊत याच्या घरात बाँब व ते बनवण्याची सामग्री मिळाली तसेच ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरीदेखील सापडले. यासंबंधात संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनाही अटक करण्यात आली. पांगरकर यांच्याशी आपला काही संबंध नसल्याचे शिवसेना आता सांगत असली  तरी सनातन संस्थेची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेतील लोकच आता बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आता तरी शिवसेनेने जागे झाले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष  आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केले. तसेच महाराष्ट्र पोलीस त्यांचे काम योग्यप्रकारे करत असून याप्रकरणाचा सविस्तर छडा लागेपर्यंत केस पूर्ण झाली असे मानता येणार नाही, असे मत मलिक यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित लेख