राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने ठाण्याकडे जाताना एकाच टोलनाक्यावर वसूली

22 Aug 2018 , 06:21:51 PM

ठाणे शहरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी देण्यात आला. याचा परिणाम म्हणून एमएसआरडीसीने वाहनचालकांना ऐरोली किंवा मुलुंड यापैकी एकाच ठिकाणी टोल भरण्याची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात प्रवेश करण्यासाठी मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर टोलवसूली केली जात असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

याकरीता टोलवसुलीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, म्हणून टोलनाके बंद करण्याबाबतची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शनिवारी परांजपे यांनी लेखी स्वरूपात पत्र देऊन एमएसआरडीसी व पोलिस प्रशासनाला उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एमएसआरडीसीने टोलनाक्यावरची सवलत दिल्याचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.

संबंधित लेख