ग्रंथालय विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा सहभाग वाढावा – जयंत पाटील

22 Aug 2018 , 11:18:03 PM

मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभागाची बैठक घेण्यात आली. विभागाच्या पुढील वाटचालीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काही योजना आखण्यात आल्या. यावेळी ग्रंथालय सेलचे संस्थापक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ग्रंथालय विभाग अधिक क्षमतेने कार्यान्वित व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. पुस्तक वाटप, वेबसाईट बनवणे या गोष्टी विभाग अधिक प्रभावी होण्यासाठी गरजेच्या आहेत. महाराष्ट्रभरात दौरेकरून कार्यकारणीचा आढावा घ्यावा, ग्रंथालय असणाऱ्याला व्यक्तींनाच पदासाठी नियुक्त करावे, यूपीएससी/ एमपीएससी तसेच तत्सम विषयाचे संच सेलद्वारे उपलब्ध करून द्यावे, अशा विविध सूचना यावेळी प्रदेशाध्यक्षांनी केल्या. या कार्यक्रमाला सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पुणे उपाध्यक्ष सुरेश घुले, ग्रंथालय सेलचे राज्यप्रमुख शिवाजीराव पाटील, सेलचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख