राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची बैठक मुंबईत संपन्न

24 Aug 2018 , 06:22:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची बैठक मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी मासिकचे संपादक सुधीर भोंगळे, मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे, मुंबई कार्याध्यक्ष श्रीपाद खानोलकर, शाहीर वामन घोरपडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे राज्यप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले की भाजप सरकारने लोककलावंतांची परवड केली आहे. याबाबत ४ सप्टेंबर रोजी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कलाकारांच्या अडचणी यावेळी जाणून घेतल्या जातील. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचीही याबाबत भेट घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ कलाकारांना वृद्धाश्रमात शेवटचे दिवस काढावे लागतात. कलाकारांचे मानधन, ग्रामीण घरकुल योजनेत कलाकारांना आरक्षण, एसटी प्रवासात सवलत, आरोग्य सेवेत सवलत, विविध कला महोत्सव पुन्हा सुरू करणे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांचा समावेश असणे, अशा विविध मागण्या तावडे यांच्याकडे केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अशा कलाकारांसाठी मदत केली होती. आज त्या कलाकारांना मदत मिळत नाही. विचारमंथन करून या लोककलावंतांना कशी मदत करता येईल, कशा योजना आखल्या जातील याबाबत चर्चा करु, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी मासिकचे संपादक सुधीर भोंगळे यांनी आज कलावंतांसाठी अडचणीचा काळ आहे, असे म्हटले. कलाकारांना योग्य सुविधा मिळत नाहीत. शरद पवार साहेबांनी मात्र नेहमीच लोककलावंतांना मदत केली, योजना आखल्या असेही ते म्हणाले.

संबंधित लेख